black and white bed linen

हडी ग्रामपंचायतमध्ये आपले स्वागत आहे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्याचा सांस्कृतिक आणि सामाजिक केंद्र

ग्रामीण विकासाची ओळख हडी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यापासुन 8 किमी.वर वसलेले गाव हडी.जिल्हा मुख्यालयापासुन 35 किमी.भौगोलिक स्थान 16 08’39’ ‘’N ‘’ व 70 28‘40’ ‘’E’’ हे आहे.तीन्ही बाजुने खाडीने वेढलेल्या दोन निसर्ग संपन्न जैवविविधतेने भरलेली मनुष्य वस्ती ,असलेली बेटे,(आयर्लड)गावाच्या मध्यावरुन जाणारा रेडी-रेवस सागरी महामार्ग सुमारे 874 हेक्टर क्षेत्र लाभलेले गाव हडी.

हडी गाव हा 15 वाडीत विभागलेला असुन गणेश चतुर्थी हा मुख्य उत्सव घरोघरी साजरा केला जातो.सर्वसाधारण 15 ते 20 घरांची एक वाडी असते.ज्या वाडीतील ग्रामस्थ एकत्र येऊन भजन मंडळ,तुळशी विवाह व त्यावाडीतील कुटुंबामधील सर्व कार्यक्रम साजरे करत असतात.गावातील प्रमुख देवालयांमध्ये गावराठि परंपरेनुसार उत्सव (जत्रा) साजरे केले जातात.यामध्ये दसरा, त्रिपुरारी पौर्णिमा,दहिकाला,पावणाई देवी जागर यांसारखे प्रमुख उत्सव असुन हनुमान जयंती,दत्त जयंती, गणेश जयंती,याप्रकारचे उत्सव ही स्थानिक पातळीवर साजरे केले जातात.दशावतार शिमग्यातील खेळ(कलाकृती),नाट्य परंपरा,फुगडी,मर्दानी खेळ,मल्ल-खांब,लाठीकाठी यांसारख्या खेळ व पारंपारिक कला अभिमानाने जोपासले जातात.

पदाधिकारी आणि कर्मचारी

सरपंच
श्री.प्रकाश वि.तोंडवळकर
उपसरपंच
श्री.भरत ज.लाड

ग्रामपंचायत अधिकारी

श्री.

गावातील उपक्रम व इतर माहिती
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)
वृक्षारोपण कार्यक्रम
बचतगटांना कुक्कुटपालन व्यवसाय करीता पक्षी वाटप

मत्स्यशेती प्रकल्प

आरोग्य तपासणी शिबिर

काथ्या प्रशिक्षण

चालू घडामोडी